उद्धव ठाकरेंवर आदित्य ठाकरे यांनी दबाव आणून शिवसेना संपवायला लावली

आ.दीपक केसरकर यांचे आदित्य ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर

नागपूर: माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता.दरम्यान याच आरोपावर आता आमदार दिपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.आदित्य ठाकरे यांनी त्यांचे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि ते काँग्रेससोबत गेले. त्यांच्यामुळे युती तुटली, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

काय म्हणाले आ.दीपक केसरकर

त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर दणकून टीका केली.ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अवाक्षर काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीयमंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते ही शिवसेनेची ताकद होती. त्याच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले आहे. त्यांनी जनतेमध्ये जायला शकले पाहिजे. त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा असा वडील म्हणून मी त्यांना सल्ला देतो.’मी महाराष्ट्राचा पहिला शिक्षणमंत्री आहे, ज्याने प्रत्येक विद्यार्थ्याला ड्रेस देण्याचा निर्णय घेतला. मुले अनवाणी पायांनी शाळेत जात म्हणून त्यांना शुज आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेतला. शालेय गणवेशाचे टेंडर १३८ कोटी रुपयांचे होते. आधी फक्त मागास वर्गातील विद्यार्थी आणि सर्व प्रवर्गातील विद्यार्थिनी यांना गणवेश दिले जायचे. या टेंडरमध्ये राज्य सरकारचे जवळजवळ ११ कोटी रुपये वाचले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ शासनाची संस्था आहे. त्यांना हे काम देण्यात आले यात वीस हजार महिला गणवेश शिवण्याचे काम करतात. त्यांना याचा अनुभव नव्हता त्याच्यामुळे कदाचित गणवेश शिवण्याला उशीर झाला असावा, अशी माहिती देत केसरकर यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले. तसेच आदित्य ठाकरे यांनी सर्व पुरावे तपासून बोलायला हवे, असेही ते म्हणाले.

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

सरकारने गणवेश वाटपासंदर्भातील जुना निर्णय रद्द केला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यात तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यात त्यांनी गैरव्यवहार केला आहे. यातील भ्रष्टाचाराची चौकशी करायला हवी. ही अनियमितता प्रशासकीय आहे की आर्थिक स्वरूपाची हे तपासायला हवे. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरयांनी शालेय गणवेशदेखील सोडला नाही. त्यातूनही मलाई खाण्याचा प्रयत्न केला. असा आरोप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *