व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेजमध्ये माॅक ट्रायल तसेच मूट कोर्ट स्पर्धा.

कुडाळ: कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कोलेज येथे मॉक ट्रायल तसेच मुट कोर्ट स्पर्धा संपन्न झाली. या अंतर्गत ट्रायल ॲडव्हकसी स्पर्धा हा प्रकार जिल्ह्यात प्रथमच आयोजीत केला गेला. १५ व १६ डिसेंबर रोजी आयोजीत या माॅक ट्रायल व मूट कोर्ट स्पर्धांमध्ये, महाविद्यालयातील विध्यार्थाना वकिली क्षेत्रामध्ये तसेच फौजदारी न्यायालयात करण्यात येणारे युक्तिवाद तसेच पुरावा दाखल करताना घेण्यात येणारा सरतपास आणि उलट तपास, त्यांच्या योग्य पद्धती, न्यायालयीन तरतुदी ह्या सर्व बाबींची ओळख होण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा संपूर्ण इंग्रजी भाषेमध्ये घेतली गेली. ह्या स्पर्धेमध्ये व्हिक्टर डांटस लॉ कोलेजचे एकूण ६ संघ सहभागी झाले होते व त्यातील उत्तम दोन संघांची निवड मुट कोर्ट स्पर्धे साठी होणार होती. या स्पर्धेचे परीक्षण रत्नागिरी मधील जेष्ठ वकील ऍड. राजशेखर मलूष्टे तसेच के. सी. लॉ कॉलेज चे प्राध्यापक डॉ. आशिष बोरसे ह्यांनी केलेस्पर्धेमध्ये एकूण ३६ विद्यार्थ्यांचा सहभाग होता ते विद्यार्थी व त्यांचे संघ खालीलप्रमाणे.

टीम ए : महीमा माने, तेजस्विनी पांगम, हिताक्षी तारी, श्रेया मयेकर, सीया मेहत्तर, तुषार गावडे.

टीम बी : प्रतीक सावंत, रोझॅन खान, साहील कोरगावकर, भक्ती खटावकर, आरजू शहा, जान्हवी गलेकर.

टीम सी : रेवती शिरसाट, याज्ञिक नाबर, एल्वीना फर्नांडिस, सानिया मकानदार, भक्ती पिंगुळकर, अंकिता राऊत.टीम डी : सुयश गवंडे, ओंकार पाटकर, श्वेता कोळी, धनश्री सावंत, सुधा दामले.

टीम इ : सुजाता गवस, हर्षाली पाताडे, श्वेता धारगळकर, संग्राम टिपुगडे, प्राची परब.

टीम एफ : मिहीरसेन पाडावे, समीता तांबे, भाग्यश्री पवार, दुर्वेश मुळे.

या स्पर्धेत टीम बी विजेते तर टीम एफ उपविजेते ठरले. या मध्ये सर्वोत्कृष्ट सरकारी वकिल म्हणून हर्षाली पाताडे, सर्वोत्कृष्ट डिफेन्स वकिल म्हणून तेजस्वीनी पांगम, बेस्ट रीसर्चर एल्वीना फर्नांडिस यांची निवड झाली.बेस्ट मेमोरीयल टीम ए, टीम बी व टीम डी यांची निवड झाली.परीक्षकांकडून साक्षीदारांना विशेष बक्षिस देण्यात आले.

ह्यात स्पर्धेमधील ४ उत्कृष्ट साक्षीदार आले ज्यात यशोधन सावंत, सहिष्णू पंडित, संजय झांट्ये आणि एडवर्ड पिंटो यांचा समावेश आहे. साक्षीदारांची तयारी तसेच संपूर्ण स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे चेअरमन व्हिक्टर डांटस यांच्या प्रमुखत्वाखाली व महाविद्यालयाच्याच्या प्राचार्य शांभवी तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी एडवर्ड पिंटो आणि संजय झांटये यांनी केली. प्रा. संग्राम गावडे यांनी सर्व स्पर्धकांना मेंटरींग केले.स्पर्धेचे टाइम किपीर्स म्हणून समृद्धी टायशेट्ये, सिताई राऊळ, लतिका वारंग, संपदा परब, श्रेया मयेकर, याज्ञिक नाबर यांनी सांभाळली तसेच कोर्ट ऑफिसर म्हणून तेजस सावंत व अभिजीत लोखंडे यांनी कामकाज पाहिले.या स्पर्धेच्या आयोजन तसेच विजेते, उपविजेते संघ आणि वैयक्तिक बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांचे चेअरमन व्हिक्टर डांटस तसेच प्राचार्य शांभवी तेंडोलकर व मेंटर प्रा. संग्राम गावडे यांनी अभिनंदन केले व पुढिल वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या.विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवर परीक्षक, मार्गदर्शक व सर्व प्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक वृंदाचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *