(संतोष हिवाळेकर )मालवण: मालवण तालुक्यातील मसदे वडाचापाठ येथे श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवान्यास (रजिस्टर) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाठ या माठाचा 13 वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी साजरा होत आहे. तरी भाविक भक्तांनी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवावी आणि तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा यानिमित्त कार्यक्रम सकाळी 8 वाजता अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज पादुका अभिषेक, सकाळी 9 वाजता श्री स्वामी समर्थांची षौडशोपचार पूजा अर्चा ,सकाळी 9.30 वाजता पालखी पूजन, सकाळी 10 वाजता अक्कलकोट पादुका पालखी मिरवणूक सोहळा ,11वाजता महाआरती, दुपारी ११:३० वाजता श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री गावडे महाराज यांचे आगमन , दुपारी 12.30 वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण,दुपारी 1 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 7 वाजता जय हनुमान प्रसादिक दिंडी भजन मंडळ मसुरे कावा यांची दिंडी, रात्री 9 वाजता श्री वाळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली कुडाळ यांचा “अघोरी विद्या “हा. दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे तरी स्वामीभक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आयोजक श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाठ