कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा २२ डिसेंबर रोजी महायुतीकडून भव्य नागरी सत्कार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून २२ डिसेंबरला ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने त्यांचे भव्य दिव्य स्वागत व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक संपन्न झाली. या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचे पूर्ण नियोजन आणि त्यांचा पहिला जिल्हा दौरा कसा असेल याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न नितेश राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास

आजपर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना राज्यात मंत्रीपद मिळालेलं नव्हतं. ते भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न नितेश राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत त्याच पद्धतीचं झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. २२ डिसेंबरला सकाळी मंत्री नितेश राणे यांचे ९,३० वा. खारेपाटण येथे दाखल झाल्यावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत होईल. तिथे उपस्थित मंडळी आणि त्या विभागातील त्या परिसरातले सर्वजण त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर १०.१५ वाजता तळेरे येथे येऊन पंधरा मिनिटे तरळ्यामध्ये थांबतील. तिथे स्वागत स्वीकारतील. त्यानंतर फणसगांव करून ११.१५ वाजता पडेलला पोहोचतील. त्यांचे स्वागत झाल्यानंतर १२ वा. वाजता मंत्री राणे देवगडला येतील. तिथे त्यांचे जंगी स्वागत होईल. १२.४५ वा तळेबाजारला स्वागत होईल. दुपारी १.१५ वाजता शिरगावला स्वागत होईल.दुपारी १.४५ मिनिटांनी नांदगाव करून दु २.३० वा भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्गनगरी येथील वसंतस्मृती येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जिल्हा मुख्यालय ओरोस फाटा येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल. त्यानंतर ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये ते भेट देतील. जिल्हा बँकेचे ते विद्यमान संचालकही आहेत आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा आपल्यातील एक संचालक राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद आहे. जिल्हा बँकेमध्ये त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बांदाकडे रवाना होतील. ४ वाजता बांदा नंतर ४.४५ वाजता दोडामार्ग येथे भव्य दिव्य असं स्वागत होईल आणि मंत्री राणे कणकवलीकडे रवाना होतील. सायंकाळी ७ ते ९ दरम्यान कणकवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री राणे यांचा नागरी सत्कार संपन्न होईल. भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी होतील आणि नंतर ते काही इतर कार्यक्रमाना उपस्थित राहतील, असे सावंत आणि दळवी यांनी सांगितले.

मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे.

सगळेजण मंत्री नितेश राणे व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी मंडळी आहेत. या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी सात वाजता जो नागरी सत्कार कणकवलीत आयोजित केलेला आहे त्यालासुद्धा मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे. आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *