ब्युरो न्यूज: टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीअखेर अपेक्षित आहे. उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत. प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात. त्यानंतर ‘टीईटी’त उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जून-जुलैमध्ये ‘टेट’ घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.