खा.नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
मुंबई प्रतिनिधी: सिंधुदुर्ग स्थानक हे जिल्ह्याच्या जिल्हा मुख्यालयात आहे. प्रशासकीय केंद्र म्हणून महत्त्व असूनही या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. सिंधुदुर्गा स्थानकात प्रवाशांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी. सिंधुदुर्ग स्टेशनवर PRS सुविधा उपलब्ध करून द्या.अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केली आहे.माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात तातडिने सेवा देण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मत मांडले आहे. या स्टेशनसाठी अमृत भारत स्टेशन योजना आणि एक स्टेशन एक उत्पादन योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्या.
या स्थानकावर प्रवाशांसाठी एलईडी इंडिकेटर आणि बारमाही सावलीयुक्त प्लॅटफॉर्मची गरज आहे.तसेच सिंधुदुर्गातून धावणाऱ्या 11099/110100 LTT मडगाव-LTT एक्स्प्रेस,०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर एक्स्प्रेस, १६३३६/१६३३७ गांधीग्राम-नगरकोइल एक्स्प्रेस. 22149/22150-पुणे-एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसना या स्थानकावर थांबा द्या. यामागण्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. राणे यांना दिले.













