संतोष हिवाळेकर: सिंधूदुर्ग कॉलेजच्या राहुल चव्हाणची दिल्लीच्या RDC परेड साठी निवड स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गतएनसीसी ट्रेनिंग घेत असलेला तसेच टी वाय बी कॉम शिक्षण या वर्गात घेत असणारा एनसीसी सीनियर अंडर ऑफिसर राहुल चव्हाणचे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिना दिवशी दिल्लीला होणाऱ्या RDC (रिपब्लिक डे कॅम्प) कॅम्प साठी सिलेक्शन झाले आहे. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली या ठिकाणी ध्वजवंदन होणार आहे. या कार्यक्रमात संचलन होते, प्रत्येक राज्याचे रथ व वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी सादर केले जातात. भारतातील आर्मी ,नेव्ही एअर फोर्स जवान परेड संचलन साठी उपस्थित असतात . याबरोबरच भारतातील प्रत्येक राज्यातून काही एनसीसी कॅडेट सिलेक्ट केले जातात हे सुद्धा परेड संचलनामध्ये सहभागी असतात .यावेळी देशातील प्रत्येक राज्यातून ठराविक एनसीसी कॅडेटना सिलेक्ट केले गेले आहे ,महाराष्ट्रातून मालवणचा राहुल उदय चव्हाणची निवड झालेली आहे. ही सिंधुदुर्ग कॉलेज साठी ऐतिहासिक घटना आहे आजपर्यंत कॉलेजच्या इतिहासामध्ये असा क्षण पाहायला मिळाला नव्हता मात्र राहुल या NCC विद्यार्थ्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. या विद्यार्थ्याने सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे, मालवणचे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचविले आहे. मालवणच्या नावलौकिकामध्ये राहुलने आणखीन भर घातलेली आहे. सध्या एनसीसीच्या तिसऱ्या वर्षाला त्याचा प्रवेश आहे तसेच तो एनसीसीचा सीनियर अंडर ऑफिसर म्हणून काम करतो, 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालिय मार्फत त्याचे सिलेक्शन झालेले आहे . सलग तीन महिने, दहा- दहा दिवसाचे कॅम्प आर्मीकडून आयोजित केले जातात त्या प्रत्येक कॅम्पमध्ये त्याचे सिलेक्शन झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार एनसीसीचे विद्यार्थी आहेत त्यापैकी हा एकमेव विद्यार्थी आहे ज्याचे दिल्लीला सिलेक्शन झालेले आहे. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल , तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम आणि इतर आर्मी ऑफिसर यांनी राहुलचे ट्रेनिंग घेतले. लेफ्टनंट प्राध्यापक एमआर खोत सिंधुदुर्ग कॉलेज यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. दिल्लीसाठी सिलेक्शन होणे म्हणजे अत्यंत कठीण बाब आहे आणि ते सर्व अडथळे पार करून त्याने ही मजल मारलेली आहे आणि ही एक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कौतुकस्पद बाब आहे .असे कर्नल दीपक दयाल (उत्तर प्रदेश)यांनी व्यक्त केले.
मालवण साठी हे एक कौतुकास्पद बाब
एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत, सिंधुदुर्ग कॉलेज मालवणचे प्राचार्य डॉ .शिवराम ठाकूर यांनी फोनवरून राहुलचे अभिनंदन केले. त्याला 26 जानेवारी ची परेड झाल्या शिवाय मालवणला परत येता येत नाही त्यामुळे फोनवरूनच कौतुक केले. त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर,, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुषे संस्थेचे सर्व संचालक मंडळ यामध्ये साईनाथ चव्हाण , संदेश कोयंडे , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर , भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी राहुलचे अभिनंदन केले. कॉलेजचे प्राध्यापक, एनसीसी चे सर्व कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस प्रमुख कोल्हे साहेब, मालवण तहसीलदार zalte मॅडम यांनी राहुलचे अभिनंदन केले. आणि मालवण साठी हे एक कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला.58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी राहुल चे कौतुक केले. कॉलेजमधील इतिहासातील ही एक ऐतिहासिक घटना आहे जी कायमस्वरूपी कॉलेजच्या आणि मालवणच्या इतिहासामध्ये नोंद राहील अशा प्रकारचे उदगार कॉलेजचे माजी एनसीसी अधिकारी गिरसागर सर ,काटकर सर, उज्वला सावंत मॅडम यांनी काढले आणि राहुलचे अभिनंदन केले. राहुल हा टोपीवाला मध्ये हायस्कूलला असतानाच skp कॉलेज खोत सर यांच्या संपर्कात होता.
टोपीवालाच्या ग्राउंड वर 26 जानेवारीला एनसीसी पोलीस पथक होमगार्ड यांची परेड चालू असताना ढोल वाजवण्यासाठी टोपीवाला हायस्कूल कडून उपस्थित असायचा त्याचवेळी त्याने ncc मध्ये प्रवेश घेण्याचे निश्चित केले होते “बारावीनंतर तो आमच्या सिंधुदुर्ग कॉलेज कॉलेजला एफ वाय बी कॉम ला आणि त्याचबरोबर एनसीसी मध्ये ऍडमिशन घेतला. . या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इतिहास घडवला जे आजपर्यंत कॉलेजला शक्य झालेले नव्हतं ते या विद्यार्थ्यांने करून दाखवलं. माझ्याकडे एनसीसी आल्यानंतर माझे एकच स्वप्न होते ते म्हणजे माझा एक तरी विद्यार्थी दिल्लीला परेड करण्यासाठी जावा हे स्वप्न माझे होते “आणि ते स्वप्न राहुल या विद्यार्थ्याने पूर्ण करून दाखवले खरोखरच माझा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे अशी प्रतिक्रिया राहुलचे मार्गदर्शक लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत सर यांनी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांनी 58 महाराष्ट्र बटालियन चे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आणि मालवण चे नाव त्याचबरोबर मालवण मधील सिंधुदुर्ग कॉलेज चे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलेले आहे की खरोखरच एक उल्लेखनीय गोष्ट आहे असे खोत सरांच्या कडून सांगण्यात आले.