उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई प्रतिनिधी: राजकीय वर्तुळात नेहमीच एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली.या मंत्रिमंळातील काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा

नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!