सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही;महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा

मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ते कसे जिंकले हे अनाकलनीय आहे. आम्ही जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न मांडू. देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासंदर्भात होती ते कळेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही भेट घ्यायला गेलो होतो”, असा खुलासा आदित्य ठाकरे यांनी दिला. “ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय मॅच्युरीटी दाखवत आहोत. महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करावं. राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्रासाठी एकत्र काम करावं याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्राच्या हिताचं काम असावं. गंमत आहे की, काही लोक आज दिसत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “छगन भुजबळ यांच्याबद्दल वाईट वाटत आहे. त्यांना एवढा अनुभव असताना त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *