नीलम गोऱ्हे की राम शिंदे?
ब्युरो न्यूज: राज्यात विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.दरम्यान या अधिवेशनात विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून विधानपरिषद सभापती पद रिक्त असल्याने या पदावर नेमकी कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापती पदाची निवड महत्वाची ठरणार आहे. कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला या पदावर संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजप आग्रही
आज कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आगामी राजकीय घडामोडींकडेही वेध लागणार आहे. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजप आग्रही आहे, कारण त्यांच्याकडे परिषदेमध्ये सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे. या पदावर सध्या राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे, शिवसेना देखील या पदासाठी इच्छुक आहे आणि त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळू शकते.आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या संदर्भात स्पष्टता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटपाच्या चर्चेदरम्यान विधानपरिषदेचे सभापती पद शिवसेनेकडे असावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.