मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी १५ डिसेंबरला

मुंबई प्रतिनिधी: येत्या रविवारी 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 34 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे 23 मंत्री, शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 मंत्री असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे 17 शिवसेनेचे 10 आणि अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!