कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

३५ किलो प्लास्टिक जप्त करून २०३०० रुपये रकमेचा दंड वसूल

कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावा – मुख्याधिकारी गौरी पाटील

कणकवली प्रतिनिधी: एकल वापर,प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला अंमलबजावणी करण्यासाठी मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नगरपंचायत हद्दीमध्ये एकल वापर प्लास्टिक वापर करणाऱ्या रस्त्यावरील विक्रेते, फुल विक्रेते, स्थानिक बाजारपेठ, भाजीपाला विक्रेते आणि दुकाने यांच्यावर न.प.अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. ही मोहीम सलग तीन दिवस राबिवण्यात आली. या मोहिमेंतर्गत ५० micron पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवी,वस्तू वापरणाऱ्या ४५ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून एकूण ३५ किलो प्लास्टिक जप्त करून २०३०० रुपये रकमेचा दंड वसूल करण्यात आला.सर्व व्यापारी व नागरिकांनी ५० micron पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याचा वापर टाळावा व कागदी किंवा कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.

error: Content is protected !!