सामाजिक कार्यकर्ते – बाळा राणे यांचे सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच.

कुडाळ प्रतिनिधी: देशहितपर प्रकल्प पूर्ततेसाठी, पणदूर जितवणे वाडी – माणुसकीचे स्मारक येथुन सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांचे बेमुदत उपोषण सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे.

सदरच्या उपोषणाबाबतचे आगावू निवेदन यापूर्वीच दिनांक ९.११.२०२४ पत्राद्वारे मान.जिल्हाधिकारी, मान. जिल्हा पोलिस अधीक्षक, मान. अधीक्षक भूमि अभिलेख, सर्व..सिंधुदुर्ग तसेच मान. पोलीस निरीक्षक कुडाळ पोलीस ठाणे कुडाळ यांना कळवले होते मात्र निवडणुकीमुळे शासन व्यवस्थेवर असलेला कामाचा ताण पाहून अखेर मांनवाधिकार दिन १० डिसेंबर २०२४ रोजी रात्रौ ९:४५ पासुन हे उपोषण प्रारंभ झालेले आहे या उपोषणाच्या माध्यमातून त्यांच्या प्रमुख दोन मागण्या आहेत त्या क्रमवार…

मागणी क्रमांक १- भूमि अभिलेख विभाग कुडाळ यांनी गाव मौजे पणदूर जितवणेवाडी येथील सर्वे क्रमांक ४४-३ , ४६-२/३ , ४३-३ हया जमिनी मोजणी करताना व या जमिनींच्या हद्दी कायम करताना घातलेले अनेक घोळ त्यांच्याच स्व खर्चाने दुरुस्त करून मिळावेत व माझ्या वडिलोपार्जित जमिनी विठ्ठल बाबाजी राणे कुटुंबियांच्या ७/१२ वरील क्षेत्राप्रमाणे आमच्या अचूक मोजणी करून मिळाव्यात.

मागणी क्रमांक २ – माझ्या वडिलोपार्जित घरांकडे जाणाऱ्या पायवाटा, रस्ते सागर रवींद्र राणे व आत्माराम ( राजू) रवींद्र राणे दोघेही राहणार जितवणेवाडी पणदूर या दोघांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे, कोणत्या पुराव्यांच्या आधारे अडविले ती कागदपत्रे किँवा कोणतेही इतर पुरावे या दोन सख्या भावांनी कुडाळ पोलिसांसमोर हजर करावेत तसेच वाटा व रस्ते अडविण्यामागे नेमका या दोन भांवाचा उद्धेश किंवा भावना नेमक्या काय आहेत ते कुडाळ पोलिसांकडे लेखी जबाबात उघडपणे स्पष्ट करावे. या दोन प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे बेमुदत उपोषण आहे.

दरम्यान त्यांनी आपल्या प्रेस नोट मधे म्हंटले आहे की या उपोषणा दरम्यान कुडाळ पोलीस माझी सर्वतोपरी काळजी घेत आहेत त्यांचा मी कायम ऋणी राहीन. मला या उपोषणातून न्याय मिळालाच पाहिजे, त्यासाठी ईश्वरी शक्ती ची मला साथ मिळेल मात्र माझा मानवजातीसाठी काही उपयोग होणार नसेल तर मला या उपोषण स्थळीच या मानवी जीवनातून अन् मानवी देहातून कायमची मुक्ती मिळावी हि वयाच्या ४९ व्या वर्षी ईश्वर चरणी प्रार्थना.. माझ्या आजवरच्या आयुष्यातील जीवनप्रवासात ९९९ लोकांनी माझे जगणे सुसह्य केलें आणि ९९ लोकांनी माझे जगणे असह्य केले.. आज दिनांक १२/१२/२०२४ वार गुरुवार उपोषण स्थळ माणुसकीचे स्मारक जितवणे वाडी पणदूर माझी सध्याची स्थिती… मानसिक दृष्ट्या मी १०% थकलोय .. आर्थिदृष्ट्या मी ९९% थकलोय.. शारीरिक दृष्ट्या ४८% थकलोय.. भावनिक दृष्ट्या ९९% थकलोय.. मात्र वैचारिक दृष्ट्या मी १% थकलोय… डोक्यावर ९० लाखांची कर्जे असताना सुद्धा न डगमगता देशहिताच्या बाता करतोय… आणि माझा मनुष्य जन्म माझ्या भारत देशासाठी सत्कारणी लागावा म्हणून creative science park हा नव्वद कोटींचा प्रकल्प स्वतःच्या बौद्धिक ताकदीच्या जोरावर २१ नोव्हेंबर २०२४ ते २१ नोव्हेंबर २०२५ या केवळ एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करु इच्छितो आहे शासनाचा एकही रुपया न घेता शासनालाच हा प्रकल्प मी हस्तांतरित करु पाहतोय तरीसुद्धा यात असे किती अडथळे मी पार करायचे याचे प्रशासन उत्तर देईल काय………???? का मी उपोषण स्थळीच स्वतःला गळफास घेवून संपवायचे का……???? बाळाचा प्रशासनास जाहीर सवाल भारत माता की जय…! वंदे मातरम् ….!!जय जवान, जय किसान, जय विंज्ञांन सामाजिक सवाल बाळा राणे या व्यक्तीचा – शालेय जीवनापासूनच विज्ञानाचं संशोधन ची आवड असणारा हा बाळा राणे…. संघर्षाच्या वाटेवर का जाऊन पोहोचला असेल….??? याला जबाबदार कोण…स्वतः बाळा राणे की आपले महाराष्ट्र शासन…..? कोण….??? कोण…..??? कोण…..???

error: Content is protected !!