कुडाळ : पिंगुळी ग्रामीण भागात दिवसातून 5 ते 6 वेळा वीज खंडित होत असल्यामुळे विध्यार्थी वर्ग,छोटे व्यवसाईक यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेंच पिंगुळी गावाचा वीजपुरवठा हा नेहमीच खंडित होत असून याला सर्वस्वी महावितरण विभाग जबादार असल्याचा आरोपही यावेळी केला होता. पिंगुळी भागात अनेक ठिकाणी मेंटेन्शची कामे अजून पूर्ण झालेली नसून विजपूरवठ्यास अडथळा ठरणारी झाडें सुद्धा तोडण्यात आलेली नसून अनेक ठिकाणी डीपी सुद्धा उघड्या स्तिथीत असल्यामुळे यामुळे दुर्घटना घडू शकते.यांची तात्काळ दाखल घेत उप कार्यकारी अभियंता विजय जाधव व कनिष्ठ अभियंता सावळाराम पेडणेकर यांनी कामाची पडताळणी करून अखेर वीज समस्या सोडवण्यास तात्काळ सुरुवात केली. यावेळी पिंगुळी उबाठा गटाचे विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर, दीपक धुरी, हेमंत पिंगुळकर,तुलसीदास पिंगुळकर दीपक गावडे, बाबल गावडे,अनिकेत आदुर्लेकर,आनंद माडये,प्रविण माडये सिध्देश दाभोलकर,रामा पिंगुळकर केदार रासम उपस्तिथ होते.