कुडाळ प्रतिनिधी: सद्गुरू राऊळ महाराज संस्थान पिंगुळी येथे शनिवार दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.तसेच दिनांक १२आणि १३ डिसेंबर रोजी श्री. गुरू चरित्र पारायण होणार आहे.तसेच श्री दत्त जयंती निम्मित धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:
पहाटे ५.३० ते ६ वा.वा.नित्य काकड आरतीसकाळी ७ ते १० वा.अभिषेक- श्री दत्तमंदिर, श्री. प. पू. स. समर्थ राऊळ महाराज समाधी स्थानी व श्री. प. पू. स. स. अण्णा महाराज समाधी स्थानीसकाळी १० ते १२.३० वा. नामस्मरण (दत्तमंदिर)दुपारी १२ ते १ वा.महाआरती – श्री दत्तमंदिर, श्री. प. पू. स. समर्थ राऊळ महाराजसमाधी स्थानी व श्री. प. पू. स. स. अण्णा महाराज समाधी स्थानीदुपारी १ ते रात्री ११ वा.अखंड महाप्रसाददुपारी १ ते ३ वा.वारकरी भजन- श्री गणेश महिला वारकरी भजन मंडळ, निवती.दुपारी ३ ते ५ वा.नाद अकॅडमी कुडाळ यांचा भक्ती संगीत गायन कार्यक्रमसायं. ५.३० ते ६.३० वा.श्री दत्त जन्मसोहळासायं. ७ ते ८ वा.श्री दत्तमंदिर व श्री. प. पू. सद्गुरू राऊळ महाराज समाधीस्थानी सांजआरतीश्रीची पालखी मिरवणूक सोहळा आई माऊली महिला चेंदवण ठोलपथकाच्या टोलवाद्याच्या गजरातरात्री 10 वा.श्री. प. पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन