कुडाळ प्रतिनिधी: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील एन.व्ही कुलकर्णी विद्यामंदिर पांग्रड चे विद्यार्थी आपल्या कलागुणांचा अनमोल ठेवा श्री रवळनाथ मंदिर निरुखे येथे श्री रवळनाथा चरणी अर्पण करणार आहेत.दरवर्षी एका नव्या उमेदिने, एक नवा संकल्प ,एक नवा विचार घेऊन हे विद्यामंदिर आपली कलागुणांची सेवा घेऊन श्री रवळनाथ देवाच्या चरणी अर्पण करतात.
या वर्षी दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ठीक ९:०० वाजता दिंडी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी श्री देव रवळनाथ भक्तांनी या दिंडी भजनाचा आस्वाद घेण्यासाठी यावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून करण्यात आले आहे.