कुर्ल्यात बेस्ट बसचा भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू

चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी: काल रात्री उशिरा कुर्ला येथे बेस्ट अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण ठरलेला बेस्ट चालक संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरुन हा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अनेकजण चिरडले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 48 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला, असे कारण प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, काहीजण या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दलही संशय व्यक्त करत आहेत. संजय मोरे याने मद्यपान केले होते का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. पोलिसांनी काल रात्रीच संजय मोरे याला ताब्यात घेतले होते. आता त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते की नाही, हे स्पष्ट होईल.

कोण आहे संजय मोरे?

संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. संजय मोरे यांच्या कुटुंबीयांनी तो दारु पीत नसल्याचे सांगितले आहे. मोरे यांना काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बस चालवायला देण्यात आली होती. त्यासाठी मोरे यांनी 10 दिवस ट्रेनिंग घेतले होते. संजय मोरे याला यापूर्वी मोठी वाहने चालविण्याचा अनुभव नसल्याचेही समोर आले आहे.याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

error: Content is protected !!