वेंगुर्ले प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ शिरोडा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सिंधुदुर्ग यांच्यावतीने मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथे अति घन आंबा लागवड व निर्यात आंबा लागवड याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पहिला सत्रात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, बँक ऑफ इंडिया शाखाधिकारी विनोद मोगली, आत्माचे प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईक-नवरे प्रमुख वक्ते सीनियर मॅनेजर जैन इरिगेशन सिस्टीम कोइमतूरचे डॉ. अमोल चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यशाळेचे दुसरे सत्र ३ वाजता सुरू होणार आहे. या सत्रात वेंगुर्ला प्रोडूसर कंपनीचे पी. आर. ओ. भूषण नाबर व एअरपोर्ट लिमिटेड कार्गो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा गोवाचे जी.एम.आर पुरुषोत्तम सिंग ठाकूर हे विमानातून आंबा वहातुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिरोडा रोटरी क्लबचे अध्यक्ष जनार्दन पडवळ, इव्हेंट चेअरमन रोटरीन सचिन गावडे, सेक्रेटरी राजन शिरोडकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, आत्माचे प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईक-नवरे, सावंतवाडी कृषी उपविभागाचे अधिकारी अनिकेत कदम, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, श्री एंटरपाइजेसचे संचालक दत्तात्रय भोसले आदी मान्यवर या कार्यशाळेत खास उपस्थित राहणार आहेत.या विशेष आंबा विषयक कृषी तंत्रज्ञाचा आंबा लागवड व निर्यात आंबा संदर्भात होणा-या मार्गदर्शन कार्यशाळेस जिल्ह्यातील नावनोंदणी केलेल्याच आंबा बागायतदार व व्यापारी यांना प्रवेश राहणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी रोटरी व अध्यक्ष जनार्दन पडवळ ९९२३५९७९९९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.या महत्त्वपुर्ण मार्गदर्शन कार्यशाळेस जिल्ह्यातील तरुण आंबा बागायतदार व आंबा व्यापारी, आंबा व्यावसायकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिरोडा रोटरी क्लबचे अध्यक्ष जनार्दन पडवळ व आत्माचे प्रकल्प संचालक भाग्यश्री नाईक-नवरे यांनी केले आहे.













