उबाठाच्या कार्यकर्त्यांना निष्ठेची शपथ घ्यायला जागृत मंदिर दिसले नाही का?
निलेश राणे यांची बोचरी टीका
ब्युरो न्यूज: रत्नागिरी मधल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी चक्क पीर बाबार शेख च्या दर्ग्यामध्ये शपथ घेतली आहे.निवडणुकीमध्ये आपण प्रामाणिकपणे काम केलं हे सिद्ध करण्यासाठी हा शपथविधी घेण्यात आला.मात्र ह्या शपथ विधी मधे जिल्हा प्रमुख आणि जिल्हा सह संपर्क प्रमुख गैरहजर असल्याचं समोर आलंय.
काय आहे सविस्तर वृत्त?
लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यात काही पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली. त्यावेळी नेत्यांसमोरच पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. पक्षातील संघटन मजबूत राहावे आणि विरोधी काम करणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचं बैठकीत ठरले. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हातिस येथे जाऊन शपथ घेऊया असं म्हटलं. त्यानंतर तालुका कार्यकारणीतील बहुतांश पदाधिकारी हातिस येथे पोहचून पीर बाबर शेख दर्गात जात शपथ घेतली.
निलेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा
दरम्यान, उबाठाचा खोटा हिंदुत्ववादी बुरखा फाटला आहे. रत्नागिरीत उबाठाच्या कार्यकर्त्यांना निष्ठेची शपथ घ्यायला जागृत मंदिर दिसले नाही का? असा सवाल करत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.













