शरीर -मनाच्या निरोगीपणासाठी मैदानी खेळ ही गुरुकिल्ली आहे :अविनाश रेवंडकर

कुडाळ प्रतिनिधी: ” शरीर मनाच्या निरोगीपणासाठी मैदानी खेळ गुरुकिल्ली आहे .खिलाडीवृत्ती वाढवण्यासाठी खेळ एक महत्त्वाचा उपक्रम आहे . क्रीडा स्पर्धा शरीर मनावरील आळस झटकून न व चैतन्य देणारा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.” असे उद्गार कुडाळ एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवणडकर यांनी काढले .ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतांमध्ये “बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही शिक्षणाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक व कलाविषक जे उपक्रम राबवते ते खरोखरच कौतुकास्पद आहेत .विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ती अत्यावश्यक गोष्ट आहे .विद्यार्थ्यांच्या भविष्यातील निकोप वाढीसाठी सुद्धा असे शैक्षणिक सहशालेय उपक्रम महत्त्वाचे असतात. त्यासाठी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेला त्यानी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात क्रीडा स्पर्धा संपन्न होण्यासाठी शपथही दिली. त्यांच्या शुभ हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक ,क्रीडा शिक्षक रोहिदास राणे इत्यादी उपस्थित होते .

दीप प्रज्वलन करून क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना उमेश गाळवणकर यांनी सुद्धा “क्रीडास्पर्धा या मुलांच्या निरोगी व्यक्तिमत्वासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करून चांगला अभ्यास व निरोगी शरीरासाठी विद्यार्थ्यांनी दिवसातून किमान एक तास तरी मैदानावर विविध खेळांमध्ये सहभाग नोंदविणे आवश्यक असल्याचे; सांगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शिक्षण संस्थेच्या परिसरा बरोबरच एक उत्तम क्रीडांगण उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व यंत्रणेचे त्यांनी आभार मानले . विद्यार्थ्यांना खेळाडू वृत्तीने क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी व्हा असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या . यावेळी विविध विभागातील मुलांनी विविध हाऊसमार्फत क्रीडा शिक्षक रोहिदास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचलन केले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते टॉस उडवून खेळाचा प्रारंभ ही करून दिला. अतिशय उत्साहाने विद्यार्थी या इंडोअर, आउटडोर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले.

error: Content is protected !!