वनविभागाने केलेल्या कारवाईत 371773/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

कसई – दोडामार्ग येथे वनविभागाची कारवाई

दिनांक ५ ऑगस्ट रोजी मौजे कसई वन सर्वे क्रमांक 170 मध्ये रात्रौ गस्त् करीत असता झाडे कापण्याच्या मशिनचा आवाज आल्याने त्या दिशेने जाऊन बॅटरीच्या दिशेने पाहणी केली असता पहाटे सुमारे 4.30 वा. सुमारास, 3 आरोपी दिसून आले. त्यातील दोन आरोपी फरार झाले असून आरोपी क्रमांक 1 पांडुरंग महादेव गांवकर रा.उसप ता. डिचोली, गोवा व आरोपी क्रमांक 2 श्याम नवनाथ तुळसकर रा. नानोडा ता. डिचोली, गोवा यांना पकडण्यात आले. सदर खैर माल नेणेसाठी आणलेले टाटा कंपनीचे डीआय वाहन क्रमांक GA06/T2775 तसेच लाल रंगाची पेंशन प्ल्स क्रमांक GA04/B-5653 व Super Steel इलेक्ट्रीक सायलेंट कटर -1 व जागेवरील खैर मालाची व बुडांची मोजमापे घेऊन बुडावर व जप्त् खैर मालावर जप्ती शिक्का SD-6 उमटवून सर्व मुददेमाल संरक्षणासाठी ताबेत घेतला, खैर नग 38/1.439 घ.मी. माल किमंत 26773/- जप्त वाहने 3 अंदाजे किमंत 300000/- व कटर मशिन अंदाजे किमंत 15000/- जप्त करणेत आला. मोबाईल नग 03 अंदाजे किमंत 30000/- असा एकंदर 371773/- किमंतीचा मुददेमाल ताब्यात घेतला. भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 (1), डी, एफ, 41(2) ब अन्वये मणेरी राऊंड गुन्हा क्रमांक सी 07/2026 दिनांक 05.08.2026 अन्वये गुन्हा नोंद केला असून, फरारी आरोपी बाबत आरोपी क्रमांक 1 व 2 यांचेकडे चौकशी केली असता आरोपी क्रमांक 3 नितेश नारायण नाईक, रा. उसप ता. डिचोली, गोवा व आरोपी क्रमांक 4 किसन शशिकांत गांवकर रा. उसप ता. डिचोली, गोवा यांना दिनांक 06.08.2026 रोजी चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास चालू आहे.

सदरची धाडसी कारवाई ही मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. मिलिश शर्मा साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. वैभव बोराटे साहेब सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी, श्री. संभाजी आनंदा पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग, श्री. तुकाराम सोपान हाक्के वनपाल मणेरी, श्री. शैलेश कांबळे वनरक्षक मणेरी, श्री.शुभम संभाजी वारके वनरक्षक, श्री. विश्राम बाबाजी कुबल वनसेवक मणेरी व जलद बचाव पथक दोडामार्ग मधील श्री. बाबू वरक, श्री. जानू पटकारे, श्री. विलास खरवत यांनी पार पाडली.

error: Content is protected !!