कुडाळ येथे आळवे फिटनेस क्लबचा शुभारंभ

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : कुडाळ येथे आज आळवे फिटनेस क्लब या नव्या जिमचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर उद्घाटक म्हणून लाभल्या. यावेळी कुडाळचे पोलीस ठाण्याचे पाटील साहेब, काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, माधवी मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी आळवे फिटनेस क्लबच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!