वेत्ये येथील ४५ वर्षीय व्यक्तीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू

सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथे एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवासी राजन रामा गावडे (वय ४५) यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या खोलीतून तीव्र केमिकलचा अथवा औषधाचा वास येत असल्याने नातेवाईकांनी दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शंका आल्याने दरवाजा तोडून पाहिले असता राजन हे मृतावस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा ताबा घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान, सदर व्यक्तीने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!