जेष्ठ व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त व्यापारी बांधवांनी घेतली भेट
कणकवली : कणकवली नगरपंचायत मध्ये नगरसेवक संकेत नाईक आणि माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांच्या उपस्थितीत नवीन होणाऱ्या अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील व्यापारी मार्केट ( जुना भाजी मार्केट) च्या पाठपुराव्या करिता भेट घेतली*
नगरसेवक सुशांत श्रीधर नाईक यांनी समस्त व्यापारी बांधवांन सोबत सविस्तर चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी आपण, नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष यांच्या सोबत चर्चा करून, आता जी फाईल श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सादर केली, त्यांना गाळे मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे ही संकेत नाईक यांनी म्हटले आहे
यावेळी सर्वच व्यापारी बांधवांनी चर्चे मध्ये भाग घेतला आणि असे महत्वपूर्ण आश्वासन मिळाले कारणे माऊली मित्र मंडळाचे सर्वेसर्वा श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत
तसेच तिन तिन वेळा नगरपंचायत मध्ये दोन ते तिन तिन तास प्रतिक्षा करून हि सन्माननीय कणकवली शहराच्या प्रशासकीय मुख्याधिकारी आम्हा व्यापारी बांधवांना काही कारणाने भेटत नसल्याने, नाराज झालेले सर्व व्यापारी बांधव, नगरसेवक संकेत नाईक यांच्या आश्वासनाने सुखावले, असे हि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी नमूद केले आहे. या शिष्टमंडळात सर्व व्यावसायिक आपले व्यवसाय बंद ठेवून सहभागी झाले होते, असे हि राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Subscribe










