राणे बंधूंची मंत्री मंडळात वर्णी?

महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी

मुंबई प्रतिनिधी : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात एकूण 288 आमदार असून मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा 43 इतकी आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही. याचदरम्यान महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. देवेंद्र फडणवीस

2. गिरीश महाजन

3. रविंद्र चव्हाण

4. मंगलप्रभात लोढा

5. चंद्रशेखर बावनकुळ

6. आशिष शेलार

7. नितेश राणे

8. शिवेंद्रसिंहराजे भोसले

9. राहुल कुल

10. माधुरी मिसाळ

11. संजय कुटे

12. राधाकृष्ण विखे पाटील

13. गणेश नाईक

14. पंकजा मुंडे

15. गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी

1. एकनाथ शिंदे

2. उदय सामंत

3. शंभूराज देसाई

4. गुलाबराव पाटील

5. संजय शिरसाट

6. भरत गोगावले

7. प्रकाश सुर्वे

8. प्रताप सरनाईक

9. तानाजी सावंत

10. राजेश क्षीरसागर

11. आशिष जैस्वाल

12. निलेश राणे

अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

1. अजित पवार

2. अदिती तटकरे

3. अनिल पाटील

4. हसन मुश्रीफ

5. धर्मराव बाबा अत्राम

6. धनंजय मुंडे

7. छगन भुजबळ

error: Content is protected !!