स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम ३२ संघांना प्राधान्य
कुडाळ प्रतिनिधी : कुडाळ येथील लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने प्रथम च डे-नाईट लाजरी चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. कुडाळ येथील तहसील कार्यालय नजीकच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ५० हजार रु. व चषक,उपांत्य सामन्यात पराभूत संघाला प्रत्येकी १० हजार रु. व चषक. मालिकावीर १० हजार रु. व चषक, वैर्क्तिक पारितोषिके; उत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,यष्टिरक्षक व क्षेत्ररक्षक प्रत्येकी ५ हजार रु. व चषक,प्रत्येक सामन्यात मन ऑफ द मॅच पारितोषिके; याप्रमाणे आहेत. संघमालकांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रथम ३२ संघांना प्राधान्य देण्यात येईल. क्रिकेट संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या द्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अभी पावसकर,मोबा,९७६४४२३४७२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या सामन्यांना रोज सायंकाळी ५ वाजल्यापासून सुरुवात होईल.













