माझे स्नेही..देवेंद्र फडणवीस;राज ठाकरे यांनी दिल्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.पण…राज ठाकरे

ब्युरो न्यूज: आज दिनांक ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शप्पथ घेत आहेत.संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक्स हॅण्डल वरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले राज ठाकरे?

आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन.२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की…मख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस. आणि उपमख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा !

error: Content is protected !!