कुडाळ तालुक्यात २८ डिसेंबर पासून फूड फेस्टिवल

कुडाळ प्रतिनिधी: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हल यावर्षी २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होत आहे. लायन्स क्लबच्या महोत्सवाचे या वर्षीचे २३ वे वर्ष आहे. विविध मनोरंजन कार्यक्रमाबरोबरच दिग्गज कलावंतांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत लायन्स क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर व लायन्स सेवा संकुल अध्यक्ष अॅड. अमोल सामंत यांनी दिली. नवीन वर्ष स्वागत पार्श्वभूमीवर दरवर्षी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन डिसेंबरमध्ये केले जाते. यावर्षी कुडाळ लायन्स क्लबच्या वतीने हा ऑटो इंडस्ट्रीयल कम फूड फेस्टिव्हल २८ ते ३१ डिसेंबर असे सलग चार दिवस सायंकाळी ६ ते रात्रीपर्यंत होणार आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी लायन्स क्लबचे ज्येष्ठ पदाधिकारी अॅड. अजित भणगे, आनंद बांदिवडेकर, सीए सागर तेली, शोभा माने, गणेश म्हाडदळकर, अॅड. मिहीर भणगे, अॅड. शेखर वैद्य, डॉ. अमोघ चुबे, जीवन बांदेकर, मंजुनाथ फडके, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!