चिवला बीच येथे २१,२२ डिसेंबरला राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा

भारतातील सर्वात मोठी स्पर्धा;१३ वर्षाची यशस्वी परंपरा

मालवण प्रतिनिधी:१४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मालवण चिवला बीच येथे २१ व २२ डिसेंबरला करण्यात आले आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी दिली.स्पर्धेत एक हजार पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत.महाराष्ट्र राज्यातील २६ जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे एक हजार स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र सोबत गुजरात, राजस्थान, झारखंड, दिल्ली, तमिळनाडू, छत्तीसगड, उडीसा, पश्चिम बंगाल, गोवा, कर्नाटक येथील निमंत्रित स्पर्धकांनीही नोंदणी केली आहे. आगामी काही दिवस ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरु राहणार आहे.आदर्शवत तसेच शिस्तबद्ध व नियोजनबद्ध आयोजनासाठी या स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देत सुरक्षेच्या विविध अद्ययावत सुविधा तैनात असतात.

भारतातील सर्वात मोठी आणि १३ वर्षाची यशस्वी परंपरा असलेली स्पर्धा

मालवणच्या सागरी पर्यटन प्रचार प्रसिद्धीत गेली १३ वर्षे या स्पर्धेचे मोठे योगदान राहिले आहे.स्थानिकांसह, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्वांच्या योगदानातून तसेच मालवण पालिका प्रशासनाच्या सहकार्याने ही स्पर्धा होत आहे. विविध सामाजिक संस्थाही या स्पर्धेसोबत जोडल्या आहेत. विशेषतः भारतातील सर्वात मोठी आणि गेली १३ वर्षे राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी फिन्स सागरी जलतरण हा स्पर्धा प्रकार प्रथमच आजोजित करण्यात आला. १० किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेमध्ये जलतरणपटूंचा प्रतिसाद लाभला. तसेच १० किलोमीटर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय व आतर विविध खुल्या सागरी जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग घेण्य मदत होणार आहे.या स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे देशभरातील फक्त चिवला बीच या एकमेव ठिकाणी होणाऱ्या सागरी स्पर्धेमध्ये गतिमंद, दिव्यांग (हँडीकॅप) जलतरणपटूसाठी विशेष गटाचे आयोजन स्पर्धेत करण्यात येते. तसेच आलेले सर्व दिव्यांग जलतरण स्पर्धक सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करतात ही विशेष बाब ठरते. यावर्षी सर्व सहभागी स्पर्धकांना टी शर्ट, कॅप, फूड पॅकेट यांसह सर्टिफिकेट, फिनिश मेडल तसेच ३२ गटातील प्रथम दहा स्पर्धकांना मेडल, मेरिट सर्टिफिकेट गिफ्ट आर्टिकल व विजेत्यांना ट्रॉफी तसेच एकत्रित मिळून ५ लाखापर्यत कॅश प्राईज असणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडूंकरिता बीच व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन तसेच कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन २० व २१ डिसेंबर रोजी चिवला बिच येथे करण्यात आले आहे. स्पर्धा वाढत असून पुढील वर्षी बीच महोत्सव स्वरूपात या स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे.

कसे आहे स्पर्धेचे नियोजन?

२१ डिसेंबर रोजी चिवला बिच, मालवण येथे सकाळी ७ वाजल्यापासून १० किलोमीटर व २ किलोमीटर दिव्यांग गट, फिन्स (FINS) सागरी जलतरण स्पर्धा होणार आहे. २२ डिसेंबर रोजी ६ ते ७५ वयोगटातील १२ विविध गटात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात येणाऱ्या स्पर्धकांची नोंदणी मामा वरेरकर याठिकाणी २० डिसेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे. जलतरण स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर पालकर (९८१९१६९०२४) व नील लब्दे (९६६५३६१७३६) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक प उपाध्यक्ष बाबा परब, उपाध्यक्ष निल लब्दे, ऑरगॅरेझर सेक्रटरी किशोर पालकर खजिनदार अरुण जगताप, सदस्य डॉ. राहुल पंतवालावलकर समीर शिर्सेकर युसूफ चुडेसा, बाबला पिंटो, लक्ष्मीकांत खोबरेकर गुरु राणे, मनोज मेथर अमित हर्डीकर यांसह अन्य सदस्य मालवणवासीय, स्थानिक, पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा होणार आहे.

error: Content is protected !!