संगीत क्षेत्राचे भूषण – भूषण पार्सेकर

सावंतवाडी प्रतिनिधी: खरतर तुझ जाणं आजही मनाला अस्वस्थ करत आहे.तुझ्या आठवणींच्या गोड क्षणांनी ओठांवर कधी हसू तर मनाला ओली जखम करून जात आहे.मनाची ही जखम कायम ओलीच राहील कारण लाख मित्र आयुष्यात आले तरी तुझी जागा कोणी भरून काढणार नाही. मित्रा तू नेहमीच सुखात हाथ आणि संकटात साथ दिलीस.भजनात जेव्हा तू तल्लीन होऊन वादन करायचास अस वाटायचं साक्षात संगीत देवता तुझ्या हातांनी भजनात रंग भरत आहे. सारा आसमंत तुझ्या वादनाने बेधुंद व्हायचा.साक्षात देवही तुझ वादन ऐकायला आमच्यात येऊन बसायचा.तू नाहीस आता तर सुर हरवल्याची जाणीव होतेय.आमच्या मनाच्या कोपऱ्यात आर्त स्वरांची गर्दी होतेय.तू यावस आणि पुन्हा दुमदुमावा आसमंत सारा..तुझ्या जाण्याने आमच्या मनाला देखील नाही मिळत थारा.कोण जाणे देवाचा हा खेळ सारा..आता सहवास तुझा नसला तरी स्मृती कायम राहील..संगीतातील एक राग कायम आठवत राहील..जीवनात प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील…भावपूर्ण श्रद्धांजली भूषण.. पंचदेवी प्रासादिक भजन मंडळ, न्हावेली – पार्सेकरवाडी व ग्रामस्थ.

error: Content is protected !!