डोक्यात मारला कोयता
सावंतवाडी तालुक्यातील घटना
सावंतवाडी : जमिनीच्या वादातून ओवळीये येथे महिलेचा डोक्यात कोयता मारून खून करण्यात आला आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडले सरस्वती धोंडी सावंत वय 65 असे तिचे नाव आहे याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सौ. सरस्वती व त्यांचे विरोधक दीर विजय कृष्ण सावंत यांचे जमीन जागेच्या कारणावरून वाद होते. आज सायंकाळी या वादाचे पर्यावसान मारहाणीत घडले. यावेळी राग मनात धरून दीर विजय कृष्णा सावंत (वय ६५) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय ३५) यांनी त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. अशा अवस्थेत त्याठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी १०८ व सावंतवाडी पोलिसांना पाचरण केले. तात्काळ सावंतवाडी पोलीस व १०८ त्या ठिकाणी मार्गस्थ झाली. परंतु त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी आणे पर्यंत त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
याप्रकरणी दीर विजय सावंत व त्याचा मुलगा रघुनाथ या दोघांना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, मंगेश शिंगाडे, प्रवीण वालावलकर आदी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव, लक्ष्मण कदम आदीनी पोलिसांना सहकार्य केले. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा एकनाथ यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.


Subscribe










