सिधुदुर्ग जिल्हा भंडारी भवनासाठी कुडाळ मध्ये भुखंड प्रस्ताव जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तातडीने मागावुन घेतला
अतुल बंगे यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कारवाई करण्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना आदेश दिले असुन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी भंडारी समाजाला दीलेला शब्द पाळला असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष श्री अतुल बंगे यांनी दीली.
कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज भवन व्हावे व त्यासाठी शासकीय भुखंड मिळावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज महासंघाने जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांच्याकडे केली होती या अनुषंगाने पालकमंत्री ना राणे यांनी आपण शब्द देत भंडारी भवन होणार आणि भुखंडही मिळणार असा शब्द दीला होता या शब्दाला जागुन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना आदेश देउन तातडीने प्रस्ताव मागावुन घेऊन कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानुसार कुडाळ तहसीलदार श्री सचिन पाटील यांनी प्रास्ताव परीपुर्ण करुन उपविभाग अधिकारी कुडाळ ऐश्वर्या काळोसे यांच्या कडे पाठवुन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवुन कार्यवाही करण्यात आली असुन भंडारी समाजाला दीलेला शब्द पालकमंत्री ना नितेश राणे यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका भंडारी समाज मंडळ अध्यक्ष तथा जिल्हा भंडारी समाजाचे जिल्हा मा अध्यक्ष श्री अतुल बंगे व जिल्हा भंडारी समाजाचे राजु गवंडे यांनी दिली.



Subscribe









