प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांची मागणी
संतोष हिवाळेकर / पोईप
राज्यभरातील पगारदार पतसंस्थांना काही समस्या भेडसावत असून यावर राज्य सहकारी फेडरेशनने सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांची कोपरगाव (अहिल्यानगर) येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.
सद्यस्थितीस पगारदार पतसंस्थांना सभासद कर्मचारी आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर कर्ज फेड न करता जण्याची परवानगी शासनाने दिल्याने कर्ज थकीत होण्याचे,एन.पी.ए. होण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे पतसंस्थांना त्यांची चूक नसताना नाहक भुर्दंड पडत आहे.यापूर्वी कर्जधारक सभासद बदली झाल्यास संस्थेचा नाहरकत दाखला घेऊनच कार्यमुक्त केला जात असे,परन्तु आता केवळ कार्यमुक्त करताना कर्जदाराच्या एल.पी.सी.वर कर्जाची नोंद करून सोडले जाते.यामुळे संबंधित कर्जदाराची रिकव्हरी येताना अनेक अडचणी येत आहेत.यामुळे पगारदार पतसंस्थांची थकीत कर्जे वाढली आहेत.तसेच सद्यस्थितीत सहकार विभागाने दिलेली कर्जमर्यादा अपुरी असून सदर कर्जमर्यादा पगाराच्या ५० पट करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गनगरी च्या वतीने कोपरगाव (शिर्डी) जि. अहिल्यानगर येथील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव येथे संस्थेचे संस्थापक चेअरमन व राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे यांची भेट घेत सदर निवेदन सादर करून सविस्तर चर्चा केली. यावेळी अध्यक्ष चंद्रसेन पाताडे,उपाध्यक्ष महेंद्र पावसकर, संचालक सर्वश्री संतोष मोरे,नारायण नाईक,विजय सावंत,दयानंद नाईक,संतोष राणे,श्रीकृष्ण कांबळी, मंगेश कांबळी, सीताराम लांबर, सचिन बेर्डे, किशोर कदम,अकौंटट मनोज सावळ, क्लार्क लक्ष्मण कसाबले, नाईक गुरुप्रसाद दळवी उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










