गोवा बनावटीच्या दारूसह ५० लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप
बांदा : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली पथकाने कारवाई केली. गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली तपासणी नाक्यासमोर करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारू साठ्यासह ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयित कंटेनरची झडती घेतली असता हा साठा उघडकीस आला. ही कारवाई गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास केली याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्याकडून मुंबईकडे जाणारा अशोक लेलँड कंपनीचा सहा चाकी कंटेनर (जीजे -१७एक्सएक्स -०८७१) इन्सुली तपासणी नाक्यावर अडवण्यात आला. या वाहनाची तपासणी केली असता, त्यात लाकडी पेट्यांच्या आडोशाने लपवलेला ६५० पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये भरलेला रॉयल ब्ल्यू माल्ट विस्कीचा साठा आढळला. यात १८० मि.ली.च्या एकूण ३१,२०० बाटल्या होत्या. यामध्ये ४० लाख ५६ हजार रुपयाची दारू, १० लाख रुपये किमतीचे कंटेनर, १० हजार रुपयेचा मोबाईल असा एकूण ५० लाख ६६ हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी वाहन चालक यज्ञेशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५० वर्ष, रा. वडोदरा, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. धनंजय साळुंखे करत आहेत.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये निरीक्षक मिलिंद गरूड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री आणि सतीश चौगुले या पथकाचा सहभाग होता.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










