मालवण : तालुकास्तरीय बालकला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सव काल आणि आज दोन दिवसांमध्ये मालवणच्या बोर्डीग ग्राऊंडवर संपन्न झाला. यामध्ये आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हेदुळच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्हास्तरासाठीच्या महोत्सवामध्ये त्यांची निवड झालेली आहे १) 100 मीटर धावणे मुलगे कार्तिक गावडे प्रथम २) उंच उडी मुलगे – कार्तिक गावडे द्वितीय ३) लांब उडी मुली पुर्वा कुबल तृतीय ५)200 मीटर धावणे मुलगे वैभव पुजारे प्रथम ६) उंचवडी मुलगे वैभव पुजारे प्रथम सांघिक १) रीले 4,× 100 मुलगे प्रथम क्रमांक वैभव, नारायण, सोहम, गोविंद २) मोठागट कबड्डी – विजेता ३)लहान गट मुली कबड्डी – उपविजेता ३)लहान गट मुली खो खो – विजेता हे सर्व खेळाडू सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय स्पर्धा महोत्सवात मालवण तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत . सर्व विद्यार्थी खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांचे माजी सरपंच नंदू गावडे यांनी अभिनंदन केले.