भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , जिल्हा शाखा – सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेची नियोजीत संयुक्त सभा रविवारी संपन्न

भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई , जिल्हा शाखा – सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेची नियोजीत संयुक्त सभा रविवार दिनांक – ०७ / १२ / २०२५ रोजी सकाळी ठिक १० . ३० वाजता श्री . संतोष बा. जाधव जिल्हा सरचिटणीस यांचे नांदगाव येथील निवासस्थानी संपन्न झाली .

सभेच्या प्रारंभी महामानव , भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थितांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या सद्भावना व्यक्त करून बाबासाहेबांना नम्रतापूर्वक अभिवादन केले .
त्यानंतर राज्यअध्यक्ष श्री . पंढरी चव्हाण साहेब , राज्य सरचिटणीस मा. अरुण होडावडेकर साहेब व राज्य पदाधिकारी यांचे मा. जिल्हा अध्यक्ष सी .आर . चव्हाण यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
या सभेला मा . श्री . सुरेश हरकुळकर यांची विशेष उपस्थिती लाभली त्याबद्दल मा . राज्याध्यक्ष यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

त्यानंतर – श्री. सुनिल अंकुश चव्हाण – तालुका अध्यक्ष वेंगुर्ला
श्री. अनिल बापू पवार . तालुका अध्यक्ष – देवगड
श्री . रामचंद्र भिकाजी नादकर – तालुका अध्यक्ष कणकवली
श्री. प्रकाश गणपत देवरूखकर – तालुका सचिव देवगड
श्री. गुरुनाथ वसंत पवार उपाध्यक्ष देवगड
सौ वर्षा वसंत समाजिसकर महिला प्रतिनिधी देवगड
श्री . भारत वि. पेंडुरकर . जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष
श्री . अंकुश रा. चव्हाण – नियोजन समिती कार्याध्यक्ष
श्री . मंगेश लक्ष्मण चव्हाण – नियोजन समिती उपाध्यक्ष
तर श्री . रमेश काकाजी कुडाळकर – कुडाळ कार्याध्यक्ष
अशा नियुक्ती देण्यात आल्या .

सदरची निवड ही निवडदिनांकापासून पुढे एक वर्षासाठी कालमर्यादित राहिल .
मा . नवनियुक्त तालुका अध्यक्ष यांनी आपल्या पदाच्या अधिकार कक्षेत राहून तालुका कार्यकारिणी नियुक्त करून समाज हिताची कामे घटनात्मक चौकटीत राहून करण्यास प्रारंभ करावा .
माहे – एक फेब्रुवारी २०२६ रोजी संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्याबाबत विचार विनिमय करून दिनांक – आठ फेब्रुवारी २६ रोजी कार्यक्रम आयोजित करण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले .

सदर कार्यक्रमामध्येच – गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव , ज्येष्ठ समाज बांधव जे संघटनेशी एकनिष्ठ आहेत अशा समाजबांधवांचा सन्मान करणे असे उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले . याबाबत नियोजनाची सभा मुख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री . देव रवळनाथ मंदिर ओरोस येथे दिनांक – अकरा जानेवारी २६ रोजी सकाळी ठिक – १० . ३० वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले .

त्यानंतर मा. जिल्हा अध्यक्ष सी . आर . चव्हाण आणि राज्य अध्यक्ष मा . पंढरी चव्हाण साहेब यांनी सामाजिक एकतेसाठी संघटनेची बांधणी व कार्य याबाबत उद्बोधक मार्गदर्शन केले .
शेवटी श्री . संतोष जाधव . सरचिटणीस यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून सभेची गोड सांगता झाली .
सदर सभेला खालील प्रमाणे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते .

श्री. अनिल मारुती चव्हाण . राज्य कार्याध्यक्ष
श्री यशवंत सखाराम देवरूखकर – राज्य सल्लागार
श्री. संजय सि. चव्हाण
श्री. नंदकिशोर रा . तेंडोलकर
श्री . भारतजी पेंडुरकर , श्री . अंकुश चव्हाण , श्री. मंगेश ल . चव्हाण , श्री . प्रकाश देवरूखकर
, श्री . रामचंद्र नादकर , श्री . गुरुनाथ पवार ,श्री . रघुनाथ चव्हाण , श्री . रमेश कुडाळकर , श्री. सहदेव चव्हाण , सौ. अंकिता अनिल पवार , सौ. अनिता अनिल चव्हाण , सो . पुजा पवार , श्री . दिगंबर पावसकर साहेब , श्री . अनिल बापू पवार इत्यादी सर्व समाज बांधव उपस्थित होते .

error: Content is protected !!