२५ जणांचा मृत्यू
गोवा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. देशभरातून लाखो लोक गोवा फिरण्यासाठी येत असतात. आता नाताळ जवळ येत आहे. त्यामुळे गोव्यातील ही गर्दी आणखी वाढणार आहे. मात्र, त्याआधीच गोव्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. नाईट क्लबला आग लागली. यात अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
गोव्यामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. गोव्याच्या उत्तरेला अर्पोरा भागात Birch by Romeo Lane नावाचा एक नाईट क्लब आहे. रात्री उशिरा या क्लबला आग लागली. या अग्नितांडवात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये 4 पर्यटक आणि 19 नाइट क्लब स्टाफचे सदस्य आहेत. त्यावरुन या अग्नितांडवाची भीषण लक्षात येईल. गॅस सिलिंडर ब्लास्ट या आगीमागे कारण मानलं जात होतं. पण स्थानिक रहिवाशांनुसार त्यांनी कुठलाही स्फोटाचा आवाज ऐकला नाही.
स्थानिकांच्या या स्टेटमेंटनंतर तपास यंत्रणा आगीच्या अन्य संभावित कारणांचा शोध घेत आहे. यात फटाके किंवा सेलिब्रेशनसाठी ठेवलेल्या रसायनं यामुळे सुद्धा आग भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. एलपीजी सिलिंडर स्फोटामुळे ही आग भडकली असावी, असं काही अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे सर्व अंगांनी तपास केला जात आहे. गोवा सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षा निकषाचे उल्लंघन, धोकादायक साहित्याची साठवणूक आणि नाइट क्लबमधली सुरक्षा व्यवस्था या सर्व अंगांनी सविस्तर चौकशी सुरु आहे.



Subscribe








