भव्य प्रचार रॅली नंतर मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
खा.नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी ही जनता,भाजपच्या पाठीशी आहे
कणकवली : आम्ही कोणावर टीका टिपणी करत नाही आहोत. ही कणकवली ची जनता वर्षानुवर्षे खास. नारायण राणे साहेबांच्या बाजूने राहिलेली आहे.राणे साहेबांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद दिले आहेत. कणकवली पासून खास. नारायण राणेंना तोडण्याचा या पूर्वीही प्रयत्न झाले.त्यांना या जनतेने यशस्वी होऊ दिले नाही. नारायण राणे साहेबांवर प्रेम करणारी ही जनता आमच्या सोबत आहे.त्यामुळे प्रत्येक गल्ली गल्लीत खास. नारायण राणेंचा आवाज घुमताना दिसतोय.या आवाजाचे रूपांतर भाजपच्या विजयात होईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी
भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार याना घेऊन कणकवली शहराच्या बाजारपेठेतून प्रचार रॅली निघाली आहे. यावेळी मंत्री नितेश राणे यांच्या समवेत, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री दिलीप तळेकर युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह 17 प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार व असंख्य भाजप कार्यकर्ते जनता मोठ्या संख्येने सहभागी झालेली होती.
मंत्री नितेश राणे म्हणाले,आमही शक्तिप्रदर्शन केलेलं नाहीय. परंतु जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कशाला म्हणतात, जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात, भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभी आहे हे आज कृतीतून दिसून आलेलं आहे.कणकवलीकरांचा आमदार आता मंत्री पालकमंत्री आहे. पुढील पाच वर्षे परत एकदा सेवा करण्याची संधी द्या, आम्ही कणकवलीकरांच्या ईच्छा आकांशा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत. आमच्यामागे शक्ती उभी आहे. एकदा संधी द्या पुढची पाच वर्षे परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा विश्वास पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
आता आमच्या प्रतिस्पर्धीना आमच्याविरुद्ध लढाई करण्यासाठी राणे कुटुंबातील एक सदस्य लागतो. हा त्यांचा नैतिक पराभव आहे. आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धीकडे स्वतःची शक्ती नाही. स्वतःची ओळख नाही. प्रत्येक गल्ली गल्लीत खास. नारायण राणेंचा आवाज घुमताना दिसतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री ही सर्व शक्ती कणकवलीकरांची सेवा करण्यासाठी सज्ज आहोत. त्यामुळे कोणी कितीही टीका करूदे आम्हाला विश्वास आहे, त्यामुळे ३ डिसेंबर ला आमचे सर्व उमेदवार निश्चित विजयी होतील असा विश्वास यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला.


Subscribe






