भाजपा ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा भारती चव्हाण यांना मातृशोक

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपच्या ओरोस मंडल महिला उपाध्यक्षा श्रीमती भारती विनायक चव्हाण यांच्या मातोश्री श्रीमती सुनिता दशरथ सावंत यांचे सोमवार दिनांक १ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. यावेळी त्या ८३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो. तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना…

error: Content is protected !!