नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता

ब्युरो न्यूज: काल दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली असून महायुतीने आपला झेंडा फडकवला आहे.दरम्यान आता राज्याला वेध लागले आहेत ते नव्या मंत्रिमंडळाचे.

महायुतीने 226 जागांचा आकडा पार करुन बहुमत मिळवले आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर 57 जागांवर शिंदेसेनेवर गुलाल उधळला आहे तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आहेत. राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

शपथविधी शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता

नव्या सरकारच्या शपथविधीसाठी महायुतीचा शिवाजी पार्कसाठी आग्रह असल्याचं कळतंय. उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळतेय. मात्र, राज्यपालांकडून अद्याप कोणत्याही पक्षाला सरकार स्थापनेचे निमंत्रण नसल्याची माहिती समोर येतेय.

error: Content is protected !!