ब्यूरो न्यूज: विधासभा निवडणूक झाली असून आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांचे.स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुका लवकरच लागणार असल्याचं समोर आलं आहे.ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार.
उद्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता
सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे.