कुडाळ : शहरातील CCTV कॅमेरे बंद असल्याबाबत आज युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली. गेले काही दिवस कुडाळ शहर येथे चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच अनुषंगाने आज युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक श्री. मुगदुम साहेब यांना कुडाळ शहरातील CCTV कॅमेरे बंद असल्याचे निवेदनाद्वारे नाही दर्शनास आणून दिले यावेळी कुडाळ शहरातील CCTV कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन पोलिस निरीक्षक यांनी दिले. यावेळी शहर प्रमुख संतोष शिरसाट, शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर, उपशहर प्रमुख गुरू गडकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, युवासेना शहर समन्वयक अमित राणे, संदीप कोरगांवकर, विनय पालकर, किरण कुंभार, प्रल्हाद म्हडदळकर, रोहन शिरसाट, विनय गावडे व शिवसैनिक उपस्थित होते