दिवाळीनिमित्त साकारली पन्हाळगडची प्रतिकृती

नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी, कुडाळ यांचा स्तुत्य उपक्रम

कुडाळ : दिवाळीनिमित्त नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी यांनी पन्हाळगडची प्रतिकृती साकारली आहे. जी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली आहे.

सध्याच्या काळात अनेक मुलं मोबाईलमध्ये एवढी गुरफटलेली आहेत की, आजूबाजूच्या जगाचा त्यांना जणू विसरच पडला आहे. त्यामुळे मैदानी खेळ, नाविन्यता यांपासून ही पिढी दूर होत चालली आहे. अशातच नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी, कुडाळ येथील मुलांनी स्वतःची कल्पकता वापरून साकारलेला पन्हाळगड खरोखरच कौतुकास पात्र ठरला आहे. जो पन्हाळगड छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे त्याच पन्हाळगडाची साकारलेली ही प्रतिकृती पाहताना मन आपसूकच इतिहासाच्या पुस्तकात डोकावते. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रम पाहून मान अभिमानाने उंचावते.

नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी यांनी साकारलेली ही पन्हाळगडाची प्रतिकृती आपल्याला आपल्या संस्कृतीची आठवण करून देत असून नरसिंह महापुरुष मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!