कल्पवृक्षावर साकारले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज

शिरोडा येथील चिमुकल्या मुलींचा स्तुत्य उपक्रम

वेंगुर्ले : आजची तरुणाई आणि लहान मुले मोबाईलच्या विळख्यात अडकलेली असताना शिरोडा येथील लहान मुली आर्या आणि तन्वी परब या दोन बहिणींनी नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून कल्पवृक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर चित्र साकारले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी याच संकल्पनेतून एका आकर्षक किल्ल्याची प्रतिकृतीही बनवली आहे.

कला ही महागड्या साहित्याशिवाय नैसर्गिक गोष्टी जपतही सुंदररित्या सादर करता येते, हे या चिमुकल्यांनी आपल्या प्रतिकृतीमधून दाखवून दिले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मुलांना निसर्गाशी जोडून कला आणि पर्यावरणाचे महत्त्व शिकवणे, ही काळाची गरज असून परब भगिनींचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.

error: Content is protected !!