पिंगुळी – साई मंदिर येथे एस. टी. बसची कारला धडक

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी साई मंदिर येथे एस. टी. बसने कारला मागून धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी येथे राज्य परिवहन मंडळाच्या गाडीने एका खाजगी कारला मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!