आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीपुरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

गुढीपूर ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीपुरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. त्यावेळी गुढीपूर येथील विजेसंबंधीच्या समस्या दूर होणार आहेत.

पिंगुळी गुढीपूर येथे ट्रान्सफॉर्मर अभावी विजेसंबंधीच्या अनेक समस्या भेडसावत होत्या. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना विजेच्या समस्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. शिवसैनिक प्रसन्ना गंगावणे यांनी ही गोष्ट आमदार निलेश राणे यांच्या कानावर घातली. त्यानुसार आमदार निलेश राणे ट्रान्सफॉर्मरसाठी त्वरीत निधी उपलब्ध करून दिला. गुढीपूर येथील विजेसंबंधीच्या समस्या दूर होणार असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच ट्रान्सफॉर्मर मंजूर केल्याबद्दल प्रसन्ना गंगावणे यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले.

error: Content is protected !!