दोघे संशयित फरार; पोलिसांकडून शोध सुरू
सावंतवाडी : तालुक्यातील एका गावात परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित दोघेही संशयित परप्रांतीय आहेत. दरम्यान या प्रकाराची कुणकूण लागल्या नंतर ते दोघे पळून गेले आहेत. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे. ही घटना काल रात्री घडली आहे.
संबंधित मुलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी घरात कोणीच नसल्याची संधी साधून त्या दोन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. अचानक झालेल्या प्रकारानंतर संबंधित मुलगी घाबरली, अशा अवस्थेत तिने ही माहिती आपल्या घरात दिली. त्यानंतर घरातील व्यक्तीने त्या ठिकाणी असलेल्या आपल्या अन्य सहकार्यांना माहिती दिली. मात्र याबाबतची कुणकुण लागल्यानंतर ते दोघे संशयित फरार झाले आहेत. त्यातील एक २७ व एक २५ वर्षाचा आहे. दोघेही परप्रांतीय आहेत. दरम्यान याबाबतची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्यांना संबंधित चिरेखाण असलेल्या मालकांकडून पळून जाण्यास मदत करण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत दुजोरा दिला आहे. घडलेली घटना खरी आहे. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे लोकेशन ट्रेस करत आहोत. तोपर्यंत संबंधित चीरेखाण मालकांना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे, असे सांगण्यात आले. मात्र याबाबत अद्याप पर्यंत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.














 
	

 Subscribe
Subscribe









