माजी आमदार राजन तेली हाती घेणार शिवधनुष्य

काही वेळातच करतील शिवसेनेत प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेच्या मुंबई येथील मेळाव्यात हा प्रवेश होणार असून, सिंधुदुर्गातील कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा या प्रवेशांमध्ये मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. हा प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाला धक्का मानला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपला देखील एक प्रकारे हा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!