युवा उद्योजक संकेत सुनिल सावंत यांचा स्तुत्य कार्य
सिताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांच्याकडून समाधान व्यक्त
कुडाळ : सारा ॲग्रोटेक कडावल यांच्याकडून सिताराम संजीवनी आश्रमास आज ग्रास कटर आणि गार्डन टूल भेट देण्यात आले. यावेळी सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांनी सारा ॲग्रोटेकचे संचालक तथा युवा उद्योजक संकेत सुनिल सावंत यांचे आभार मानले.
सीताराम संजीवनी आश्रमास साफसफाईच्या कामासाठी ग्रास कटरची आवश्यकता होती. काही दिवसांपूर्वी सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांनी सिंधुदर्पण न्युज चॅनेलचे संचालक चिन्मय घोगळे यांना ही गोष्ट सांगितली. चिन्मय घोगळे यांनी लगेच ही बाब आपले बंधू तथा सारा ॲग्रोटेकचे संचालक संकेत सावंत यांच्या कानावर घातली. यावेळी संकेत सावंत यांनी कशाचाही विचार न करत ताबडतोब आपला होकार दर्शवला.
रविवारी सानिका तुळसकर यांनी सारा ॲग्रोटेक कडावल येथे भेट दिली. यावेळी सारा ॲग्रोटेकचे संकेत सावंत यांनी सी.सी.के. कंपनीचा मॅन्युअल ऑपरेटर ग्रास कटर त्यांच्या ताब्यात दिला. यावेळी सानिका तुळसकर यांनी समाधान व्यक्त करत सारा ॲग्रोटेक आणि संकेत सावंत यांचे मनापासून आभार मानले. तसेच सारा ॲग्रोटेकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.














 
	

 Subscribe
Subscribe









