कुडाळ : मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाला निरुखे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी याबाबत ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एकूण १०७ ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवली. या अभियानामध्ये पारितोषिक मिळवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. यापूर्वी देखील देखील या गावाला आर.आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झाला असून पुन्हा एकदा पुरस्कार मिळवण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.


Subscribe









